"राऊत, तुम्हीही जामिनावरच बाहेर आहात हे विसरू नका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:40 IST2024-02-06T11:39:50+5:302024-02-06T11:40:09+5:30

नरेश म्हस्के यांचा राऊतांवर पलटवार

Sanjay Raut, don't forget that you too are out on bail | "राऊत, तुम्हीही जामिनावरच बाहेर आहात हे विसरू नका"

"राऊत, तुम्हीही जामिनावरच बाहेर आहात हे विसरू नका"

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : संजय राऊतांनी आरशातही बघावे, आपण कोण आहात आणि कोणत्या गुन्ह्यात आपल्याला अटक झाली होती आणि जामिनावरच आपणही बाहेर आहोत हेही लक्षात असू द्या, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला. 

खा. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करणाऱ्या गुंड हेमंत दाभेकर याचा फोटो राऊत यांनी ट्विट केला. दाभेकर हा मोहोळ टोळीशी संबंधित असून तो जामिनावर बाहेर असताना त्याने खा. शिंदे यांचा सत्कार केला, अशी टीका राऊत यांनी केली.  ट्विटमध्ये म्हस्के यांनी अरे वा! संजय राऊत, तुम्हाला गुंड लोकांची बरीच बारकाईने माहिती आहे, असं दिसतंय. काल हजारो लोकांनी येऊन खा. डॉ. शिंदे यांना शुभेच्छा दिल्या, त्यात हा गुंड व त्याला घेऊन येणारा कार्यकर्ताही होता. जो या गुंडाला घेऊन आला त्या अनिकेत जावळकरची आम्ही हकालपट्टी केली. यापुढे चारित्र्याचा दाखला घेऊन येणाऱ्यालाच भेटावे असेही ठरवल्याची खोचक प्रतिक्रिया म्हस्के यांनी दिली. 

Web Title: Sanjay Raut, don't forget that you too are out on bail