शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
2
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
3
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
4
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
5
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
6
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
7
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
8
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
9
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
10
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
11
"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
12
Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
13
Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
14
WhatsApp सुरक्षित राहणार, पर्सनल चॅटची चिंता मिटणार; 'हे' आहेत ८ दमदार सिक्योरिटी फीचर्स
15
Video: तब्बल २.५ कोटींच्या पॅकेजची ऑफर; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यानं रचला नवा इतिहास
16
जगाला पैसे वाटणाऱ्या चीनवर किती कर्ज? भरभराटीच्या अर्थव्यवस्थेमागील काळे सत्य काय? धक्कादायक अहवाल
17
भारतीय बाजारात या दिवशी लॉन्च होणार Nissan Tekton; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सविस्तर
18
'आमचा लाडका...', विकी-कतरिनाने सांगितलं लेकाचं नाव; फोटो पोस्ट करत दाखवली झलक
19
सलग दुसऱ्यांदा PM बनण्यासाठी मेलोनींची नवी खेळी, ५३% जनतेच्या विरोधात जाऊन घेणार निर्णय
20
Hema Malini : "रोज रात्री कोणीतरी माझा गळा दाबतंय..."; हेमा मालिनींनी सांगितला थरकाप उडवणारा अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:20 IST

महाराष्ट्राचे लक्ष मुंबईनंतर ठाण्याकडे लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.     

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहराची ओळख सध्या विकासाची नव्हे, तर भ्रष्टाचार, ड्रग्स आणि गुन्हेगारीचे केंद्र म्हणून होत असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवार केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.      महाराष्ट्राचे लक्ष मुंबईनंतर ठाण्याकडे लागले आहे. तुतारीवाले वाटेत आहेत, मात्र तुतारी थोडी जड आहे, असा टोला लगावत राऊत यांनी मनसे- उद्धवसेना  युतीचा प्रचार ठाण्यात सुरू झाल्याचे जाहीर केले. ठाणेकरांसाठी संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील एकंदर परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत राऊत म्हणाले, ठाणे हळूहळू ड्रग्सचे अड्डे बनत चालले आहे. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची नव्हे, तर एक पिढी उद्ध्वस्त करणारी बाब आहे. या विषयावर ठाणेकरांनी मतदान केले पाहिजे.” ड्रग्सचे जाळे साताऱ्यापर्यंत पोहोचल्याचा आरोप केला.

राऊत म्हणाले की, आमचे उमेदवार पोलिसांच्या मदतीने उचलले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते नेमके काय करत आहे? ठाण्यात रेहमान डाकूसारखे गुन्हेगार खुलेआम वावरत असल्याचाही आरोप त्यांनी केला. महापालिका कोणी लुटली? कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत, पण कोट्यवधींच्या इमारती उभ्या राहिल्या. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिका लुटल्या म्हणूनच ही संपत्ती उभी राहिली. ठाण्याची ओळख आता ‘नमो ठाणे’ अशी करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाण्यात हे फलक लावताना एकनाथ शिंदे यांना लाज वाटली पाहिजे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane's identity changed under rulers: Sanjay Raut criticizes Mahayuti.

Web Summary : Sanjay Raut accuses ruling party of transforming Thane into a hub of corruption, drugs, and crime. He criticized them during a press conference ahead of upcoming municipal elections, highlighting concerns about law and order and financial mismanagement.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Sanjay Rautसंजय राऊत