लाचखोर संजय घरतला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 13:30 IST2018-06-22T13:30:04+5:302018-06-22T13:30:04+5:30
केडीएमसीचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला.

लाचखोर संजय घरतला जामीन मंजूर
कल्याण - केडीएमसीचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासुन ठाणे कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या घरतसह दोघांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१३ जूनला केडीएमसी मुख्यालयातील दालनात आठ लाखांची लाच घेताना घरत आणि दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. अटकेनंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयात मंगळवारी जामिनासाठी अर्ज केला होता. परंतू त्यावर दोन दिवस निर्णय झाला नव्हता. आज न्यायालयाने तिघांना जामिन मंजूर केला. अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचेची मागणी घरत याच्याकडून करण्यात आली होती.