शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिलारक्षक

By admin | Updated: September 1, 2016 02:57 IST

कोपरी येथील महापालिकेच्या शाळेत बोर्डाच्या सुरक्षारक्षकांनी दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालिका

ठाणे : कोपरी येथील महापालिकेच्या शाळेत बोर्डाच्या सुरक्षारक्षकांनी दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालिका शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आणि पुरुष सुरक्षारक्षकांऐवजी दिवसपाळीसाठी महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. एकीकडे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नव्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरीकडे कोपरी परिसरातील महापालिका शाळांतील सुरक्षारक्षकांच्या कृत्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पाचवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींसोबत घडलेल्या प्रकारामुळे अनेक पालकांना धक्का बसला असून या घटनेमुळे त्यांच्या मनात धडकी भरली आहे. तसेच विद्यार्थिनींमध्येही भीतीचे वातावरण आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय करण्याची मागणी पुढे आली होती. या घटनेचे पडसाद बुधवारच्या महासभेतदेखील उमटले. कोपरीच्या घटनेनंतर महापालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत, असा सवाल सेनेच्या महेश्वरी तरे यांनी केला. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा पर्याय नगरसेविका यांनी सुचवला. (प्रतिनिधी)