शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील मनाला चटका लावणारं वास्तव; रस्ता नसल्याने २९४ बालमृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 06:49 IST

नवीन पुलांसाठी निधी राखीव, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत स्थळ प्रत्यक्ष पाहणी करून १६५ गावपाड्यांतील रस्त्यांची कामे निश्चित करण्यात आली आहेत.

रवींद्र साळवे

मोखाडा : जव्हार-मोखाड्यातील अनेक गावपाड्यांना  जोडणारे रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना सोयी-सुविधांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. आजही येथील आदिवासी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी, दवाखान्यात आणण्यासाठी डोली करून ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

वर्षभरात प्रसूतीच्या सेवा न मिळाल्याने २० मातांचा मृत्यू झाला आहे, तर २९४ बालमृत्यू झाले आहेत. यामुळे रस्ता व पुलाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, जव्हारसाठी २८ कोटी ७५ लाख तर मोखाड्यासाठी ३४ कोटी ५० लाख रुपयांची नवीन पुलांसाठी तरतूद करण्यात आली आहे.  यामुळे भविष्यात रस्ता व पुलांअभावी होणारी परवड थांबणार असल्याची चिन्हे आहेत.

मूलभूत सुविधांपासून आदिवासी पाडे वंचितजव्हार तालुक्यातील हुंबरण, सुकळीपाडा, डोंगरीपाडा, उदारमाळ, केळीचापाडा, निंबारपाडा, तुंबडपाडा, दखण्याचापाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाट्टीपाडा, सावरपाडा, सोनगीरपाडा, घाटाळपाडा, भुरीटेक आणि बेहेडपाडा तर मोखाडा तालुक्यातील कोल्हेधव, मुकुंदपाडा, बिवलपाडा, शेंडीपाडा, जांभूळपाडा, रायपाडा, किरकिरेवाडी, मरकटवाडी, आमले येथील आदिवासी खेड्यापाड्यांत रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. 

१६५ गावपाड्यांतील रस्त्यांची कामे 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत स्थळ प्रत्यक्ष पाहणी करून १६५ गावपाड्यांतील रस्त्यांची कामे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गावपाडे, रस्ते व पुलांबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. १६५ वस्त्यांकरिता १४५ रस्त्यांची आवश्यकता असून त्यापैकी ३० रस्ते वर्गीकृत प्लान रोडमध्ये आहेत, तर उर्वरित ११५ रस्ते ‘अ’ वर्गीकरणात आहेत. जव्हार तालुक्यात ४५, वाडा ५, विक्रमगड ३१, मोखाड्यात १७, पालघरमध्ये १४ अशा सहा तालुक्यांतील ११५ रस्त्यांसाठी १५० कोटी ९५ लाख ५० हजारांचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.