Russia Ukraine War: युक्रेनमधील 'मुस्कान'ला केंद्रीयमंत्र्यांनी दिला धीर, तुमच्या पाठिशी सरकार खंबीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 23:01 IST2022-03-02T23:00:00+5:302022-03-02T23:01:44+5:30
भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पडघा येथील मुस्कान सोबत संवाद साधत तिला धीर दिला

Russia Ukraine War: युक्रेनमधील 'मुस्कान'ला केंद्रीयमंत्र्यांनी दिला धीर, तुमच्या पाठिशी सरकार खंबीर
भिवंडी : युक्रेन रशिया युद्धाचा सर्वाधिक फटका भारतातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना बसला असून युक्रेनमध्ये भारतातील सुमारे १८ हजार विद्यार्थी या युद्धामुळे अडकून पडले आहेत. केंद्र शासनाच्यावतीने अनेक विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी मिशन गंगा मोहीम राबविली जात असून अनेक विद्यार्थी मायदेशी परतले देखील आहेत. मात्र भिवंडीतील पडघा येथील मुस्कान हि विद्यार्थिनी आजही किवमध्ये अडकली आहे.
भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पडघा येथील मुस्कान सोबत संवाद साधत तिला धीर दिला. भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप माघारी आणणार असून त्यासाठी धीर धरावा व तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यावी असे कपिल पाटील यांनी मुस्कान सोबत मोबाईल व्हिडीओ संवादादरम्यान सांगितले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुस्कनाला फोन करून धीर दिल्याची महिती मुस्कानच्या कुटुंबियांना कळताच कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केला आहे.