Rugby closed due to lack of drivers | चालकांअभावी रुग्णवाहिका बंद, नागरिकांमध्ये तीव्र संताप

चालकांअभावी रुग्णवाहिका बंद, नागरिकांमध्ये तीव्र संताप

मुरबाड : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सतर्क राहणच्या सूचना असतानाही मुरबाड तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सहा केंद्रांत चालक नसल्याने तेथील रुग्णवाहिका बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रु ग्णवाहिका दिलेली आहे. यासाठी चालक, इंधन खर्चाचीही तरतूद केलेली असते. आरोग्य केंद्रासाठी लागणारा औषधसाठा आणण्यासाठी ही वाहने १५ दिवसांतून एकदा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात जातात. परंतु, मुरबाड तालुक्यातील नऊपैकी म्हसा, नारिवली, तुळई, धसई, सरळगाव, शिरोशी या सहा आरोग्य केंद्रांतील रु ग्णवाहिकांसाठी दोन वर्षांपासून चालक नसल्यामुळे नागरिकांना तातडीच्या उपचारासाठी खाजगी वाहनांचा शोध घ्यावा लागतो. कोरोनामुळे खाजगी वाहनचालक रु ग्णांची वाहतूक करण्यासाठी प्रथम नकार देतात. नंतर, मनमानी भाडे आकारतात. दरम्यान, मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथे तीन रुग्णवाहिका असून वाहनचालक दोन असल्याने एक रुग्णवाहिका उभी आहे.

या आरोग्य केंद्रांत असणाऱ्या वाहनांवरील चालक यांची इतरत्र बदली केली आहे. तर, काही ठिकाणी सेवानिवृत्त झाले असल्याने रिक्त पदे भरण्याची जबाबदारी ही गटविकास अधिकारी यांची आहे.
- श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी

रिक्त पदे भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. ते मिळताच भरती प्रक्रि या केली जाईल.
- रमेश अवचार, गटविकास अधिकारी

Web Title: Rugby closed due to lack of drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.