शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

म्हाडाने उभारलेल्या कोविड रूग्णालयातील साहित्य पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 11:53 PM

Robbery : चोरीचा गुन्हा दाखल करणार- डाॅ. जितेंद्र आव्हाड

ठाणे -  कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रूग्णालयाची उभारणी केली होती. या रूग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावण्यात आले होते.  मात्र, मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना ठामपाचे आरोग्य अधिकारी डाॅ.  मुरूडकर यांनी हे सर्व साहित्य लंपास केले असल्याचे उघडकीस आले आहे.  जर, हे साहित्य जसे होते त्या स्थितीत 48 तासात पुन्हा स्थानापन्न केले नाही तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार कळवा आणि मुंब्रा भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी केली होती. कौसा येथे म्हाडाच्या वतीने अद्ययावत असे कोविड रूग्णालयाची उभारणी केली होती.  मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. हाच फायदा घेऊन डाॅ.  मुरूडकर यांनी सर्व साधने लंपास केली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथील रूग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. 

या प्रकारामुळे डाॅ.  जितेंद्र आव्हाड हे प्रचंड संतप्त झाले आहेत. गोरगरीबांसाठी  उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणार्या  डाॅ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचना त्यांनी केली आहे.   डाॅ.  आव्हाड यांनी सांगितले की,  कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता , त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांकडे  विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला.  ठामपाचे आरोग्य अधिकारी डाॅ मुरूडकर यांनी रूग्णालयातील सुमारे 94 व्हेंटीलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत. म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना पाईपलाईनदेखील तोडून टाकण्याचे काम मुरूडकर यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे बारा ते चौदा कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली? असा सवाल करीत  अशा बेजबाबदार अधिकार्यांला  तत्काळ निलंबित करावे, तसेच येत्या 48 तासात सर्व साधने पूर्व स्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही डाॅ.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RobberyचोरीMuncipal Corporationनगर पालिकाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेmhadaम्हाडाcorona virusकोरोना वायरस बातम्या