शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

रिपाइं सेक्युलर, राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी, काँग्रेसला विश्वासात न घेताच पार पडली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:51 AM

अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक एप्रिलमध्ये होणार असून या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं सेक्युलर यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक एप्रिलमध्ये होणार असून या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं सेक्युलर यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी आणि रिपाइं सेक्युलर यांची पुन्हा आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत एकत्रित काम करणाऱ्या काँग्रेसला विश्वासात न घेता ही बैठक उरकण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चाही रंगली आहे.अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि रिपाइं सेक्युलरचे प्रमुख श्याम गायकवाड यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष आगामी पालिका निवडणुकीत पुन्हा एकत्र येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या पालिका निवडणुकीत हेच दोन्ही पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही हेच दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे सदस्य या बैठकीत उपस्थित नव्हते. दोन्ही पक्षांतर्फे आगामी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी सदाशिव पाटील यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्यास राष्ट्रवादीकडून पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.>राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर करणे, हा त्यांचा हक्क आहे. याचा अर्थ असा नव्हे की, आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पक्षातील वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आघाडीचा निर्णय घेण्यात येईल. शहराच्या विकासासाठी आणखी काही पक्ष एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर आमच्या सोबत जे येतील, त्यांना घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. - प्रदीप पाटील, अंबरनाथ ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस