येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 10:51 IST2021-01-18T10:49:46+5:302021-01-18T10:51:12+5:30

मिथुन यांच्या डोक्याला तर त्यांची पत्नी रेश्मा हिच्या डोके आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे

The rickshaw overturned in Yeoor ghat; The driver was killed and three others were injured | येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी 

येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी 

ठाणे: येथील येऊर घाटात रविवारी मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ऑटो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक दीपक भिडे (४२) यांचा जागी मृत्यु झाला आहे. तसेच मिथुन मुकुंद मंडळ (२६), त्याची पत्नी रेश्मा (२३)आणि सुभाषण फुलचंद यादव (२४) असे तिघे जखमी झाले आहेत.

मिथुन यांच्या डोक्याला तर त्यांची पत्नी रेश्मा हिच्या डोके आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलिस आणि आ. व्य. कक्षातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू करून जखमी व्यक्तींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. ही रिक्षा रामबंश यादव यांच्या मालकीची असून या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र अपघात नेमका कसा घडला हे अद्यापही समजू शकलेले नाही अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.

Web Title: The rickshaw overturned in Yeoor ghat; The driver was killed and three others were injured