शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महसूलने घेतली दुटप्पी भूमिका

By admin | Updated: January 7, 2016 00:40 IST

मीरा रोड येथील ज्या जमिनीवर पालिका इमारतीची उभारणी करण्यात येणार होती ती जमीन दोन विकासकांना देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी केली

राजू काळे,  भार्इंदर मीरा रोड येथील ज्या जमिनीवर पालिका इमारतीची उभारणी करण्यात येणार होती ती जमीन दोन विकासकांना देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी केली असल्याचा दावा एकीकडे महसूल विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे करून आपली कातडी वाचवत आहे तर दुसरीकडे ही जमीन अतिक्रमित असल्याच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा मानभावीपणाही प्रशासनाने केला आहे. त्यामुळे एकाचवेळी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या महापालिकेचे कोकण विभागीय आयुक्तांच्या चौकशीतून कसे वस्त्रहरण होते, याकडे मीरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.पालिकेने मीरारोड येथील सर्व्हे क्र. ४७८ व ४८१ मधील सुमारे १८ एकर जागेवर विकासाकरिता आर. एन. ए. व सालासर युनिक या दोन विकासकांना परवानगी दिली. पालिकेच्या इमारतीच्या उभारणीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यावर ही जमीन महापालिकेच्या मालकीची नसल्याचे उघड झाले. मात्र आता सर्व कागदपत्रांची छाननी करून जमीन विकासकांना दिली होती, असा दावा पालिका मुख्यमंत्री कार्यालयाकडे करीत आहे. महापालिकेचा हा दावा खरा असेल तर मग जमीन अतिक्रमित असल्याची तक्रार आल्यावर कारवाई का केली हा प्रश्न उरतोच.५ जानेवारी १९५३ मधील फेरफारनुसार ही जमीन शासकीय असल्याची नोंद असताना त्याच्या सातबारा उताऱ्यावर खाजगी व्यक्तींची अथवा कंपन्यांची नावे कशी काय आली, हा संशोधनाचा विषय आहे. तसेच त्या जमिनीवरील दलदल नष्ट करण्यासाठी महसूल विभागाने खाजगी विकासकांना दिलेली भरावाची परवानगी व त्यापोटी रॉयल्टीच्या माध्यमातून १० लाख ३६ हजार रु. वसुली कोणाच्या आदेशाने करण्यात आली. शिवाय तीनवेळा देण्यात आलेला अकृषिक दाखल्याच्या करापोटी प्रती वर्ष ७८ हजार रु. प्रमाणे महसूल विभागाने १९९३ ते २०१५ दरम्यान सुमारे २० लाखांची वसुली जमीन शासकीय असतानाही कशी काय केली. त्यावेळी सरकारला शासकीय जागेची आठवण नव्हती का, असा सवाल बिल्डर लॉबीकडून केला जात असला तरी याच शासनाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागणीनुसार १९ आॅक्टोबर २०१५ रोजी कार्यालयाला सकारात्मक अहवाल सादर केल्याची बाबही आश्चर्याचा धक्का देणारी ठरत आहे.