ठाण्यात इमारतीला तडा गेल्याने रहिवाश्यांना अन्यत्र हलवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 10:39 IST2020-07-17T10:39:35+5:302020-07-17T10:39:52+5:30
मध्यरात्री खोपट येथील चार मजली इमारतीला तडे गेल्यामुळे इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली आहे. गोकुळवाडीतील ही 20 वर्षीय या इमारतीला रात्री तडे गेल्यामुळे तिला रिकामी केली आहे.

ठाण्यात इमारतीला तडा गेल्याने रहिवाश्यांना अन्यत्र हलवले
ठाणे - ठाणे शहर परिपरात पावसाची रिपरिप सुरुच आहे. या दरम्यान मध्यरात्री खोपट येथील चार मजली इमारतीला तडे गेल्यामुळे इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली आहे. गोकुळवाडीतील ही 20 वर्षीय या इमारतीला रात्री तडे गेल्यामुळे तिला रिकामी केली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून या इमारतीतील रहिवाश्यांना येथील शाळेत हलविले. तेथे त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. शहर परिसरात गेल्या 24 तासात 56 मिमी पाऊस पडला. या कालावधीत मुंब्रा येथील कोळीवाडा येथे एक जुनी भींत धोकादायक स्थितीत आहे. साकेत रोडवरील महालक्ष्मी मंदिर जवळ व कौसा येथे प्रत्येकी एक झाड उन्मळून पडले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळील झाडाच्या फांद्या तुटल्याचे येथील महापालिका प्रशासनाने निदर्शनात आणून दिले.
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अवघा 104 मिमी. म्हणजे सरासरी 14.89 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात 56 मिमी पाऊस पडला. या खालोखाल कल्याण 14 मिमी. , मुरबाड ला तर एक थेंबही पाऊस पडला नाही. अंबरनाथ 4 मिमी, उल्हासनगर 5, भिवंडी 15, शहापूर ला 10 मिमी पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसीला आणि नगर परिषदांना पाणी पुरवठा करणार्या बारवी धरणात ही पाऊस पडला नाही. या धरणात 45 टक्के पाणी साठा तयार झालेला आहे.