शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मीरारोड येथे दरवर्षीच्या पुरामुळे रहिवाशांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:17 AM

महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराने परिसरात झालेल्या बेकायदा भरावाच्या गंभीर समस्येने दरवर्षी होणाऱ्या पूरस्थितीने मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता, पूजा पार्क, विनयनगरमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे.

मीरा रोड : महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराने परिसरात झालेल्या बेकायदा भरावाच्या गंभीर समस्येने दरवर्षी होणाऱ्या पूरस्थितीने मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता, पूजा पार्क, विनयनगरमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. महापालिका आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळत असल्याने रहिवासी महासंघातील ३३ गृहसंकुलांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला आहे.मीरा रोडच्या झंकार कंपनीमागे - काशिगावखाली आलेल्या सिल्व्हर सरिता या गृहसंकुलाच्या मागील भागात बेकायदा मातीचा भराव दिवसरात्र करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक महिला या महापालिकेत सातत्याने आपल्या तक्रारी घेऊन यायच्या. परंतु, महापालिका प्रशासनासह महसूल व पोलीस विभागाचेही भरावमाफियांशी लागेबांधे असल्याने आजतागायत कोणतीच ठोस कारवाई केली नाही.मोठ्या प्रमाणात झालेल्या भरावामुळे येथील पाणी वाहून जाणारे नैसर्गिक नाले अरुंद झालेच, शिवाय पाणी साचून ठेवणारे पावसातील पाणथळ नष्ट केले गेले. भराव करून मोठ्या इमारतींचे प्रकल्प पालिकेच्या मंजुरीने बांधण्यात आले, जेणेकरून सिल्व्हर सरिता आदी वसाहती सखल झाल्या. नंतर, बांधलेले विनयनगर, पूजा पार्कही पाण्याखाली आले.दरवर्षी पावसाळ्यात येथे सात ते नऊ फूट पाणी साचते. घरातून बाहेर पडणे विद्यार्थी, रहिवाशांना शक्य होत नाही. महत्त्वाचे काम असेल वा कोणी येणार असेल, तरी बोटीचा वापर करावा लागतो. तळ मजल्यावरील नागरिकांचे तर संसार असून नसल्यासारखे झाले आहेत. कधी पाण्याची पातळी वाढेल आणि घर, दुकान सोडून बाहेर निघावे लागेल, याचा नेम नसतो. वरच्या मजल्यांवर राहणारे शेजारीच तळमजल्यावरील पूरग्रस्त शेजाऱ्यांना मदतीचा हात देत आपला शेजारधर्म पाळतात. सततच्या पूरस्थितीने तळमजल्यावरील बांधकाम निकृष्ट होऊन इमारतीलाच धोका निर्माण होऊ लागला आहे.या परिसरातील ३३ गृहसंकुलांमध्ये राहणाºया नागरिकांच्या मरणयातना संपण्याचे नाव नसताना दुसरीकडे निवडणुका आल्या की, राजकारणी नेहमीच समस्या सोडवण्याची आश्वासने देत मते मागायला येतात. परंतु, निवडणूक झाली की, आश्वासनेही पावसाच्या पुरात वाहून जातात.स्थानिक नगरसेवकही आयुक्तांना, पालिका अधिकाºयांना घेऊन येतात आणि इतिहासाचे व आश्वासनांचे मोठे दाखले देऊन निव्वळ आजपर्यंत रहिवाशांची फसवणूक करत आल्याचा संताप रहिवाशांनी व्यक्त केला आहे.रहिवासी महासंघाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालिका आयुक्तांना गुरुवारी लेखी निवेदन देऊन विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. सिल्व्हर सरिता, विनयनगर, पूजा पार्क परिसरात भरावाची समस्या गंभीर असूनही महापालिका मात्र उदासीन आहे.तोडग्याबाबत पालिका गंभीर नाही२० सप्टेंबर रोजी स्थानिक नगरसेवक व उपमहापौर चंद्रकांत वैती, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर व स्थानिक नगरसेवकांनी अधिकाºयांसह परिसराला भेट दिली. २७ सप्टेंबर रोजी आयुक्तांची रहिवाशांनी भेट घेतली. पण, आमच्या समस्येवर तोडगा काढण्यात पालिका गंभीर नसून ठोस तोडगा सांगितलेला नाही. पालिकेच्या उदासीनतेमुळे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार रहिवाशांनी स्पष्ट केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mira roadमीरा रोड