शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायटींना पुन्हा तारीख पे तारीख, महापालिका बजावणार पुन्हा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:08 PM

सहा महिने उलटूनही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोसायटी धारक पुढे येत नसल्याने, पालिकेने पुन्हा एकदा या सोसायटीधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निश्चित केले आहे. तसेच या संदर्भातील प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहरातील १० टक्केच सोसायटींनी केला अमंलसोसायटीधारकांमध्ये पालिका करणार जनजागृती

ठाणे - शहरातील सोसायटींनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारची जनजागृती करण्यात आली. परंतु त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायटींनी त्यावर अद्याप अमल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पालिकेने मे महिन्यापासून शहरातील सोसायटींचा कचरा न उचलण्याची भुमिका घेतली होती. परंतु आता पुन्हा पालिकेने घुमजाव करीत या सोसायटीधारकांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कचरा उचलणे बंद न करता नोटीसा बजावण्याची कारवाई पुन्हा एकदा केली जाणार आहे.       घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी निदान या सोसायटी कचरा प्रक्रि येसाठी पुढाकार घेतील असा विश्वास पालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. कचऱ्यावर प्रक्रि या करण्यासाठी सोसाट्यांमध्ये असलेला संभ्रम आणि महापालिकेनेच कचऱ्यावर प्रक्रि या करण्यासाठी एखादी एजन्सी नेमून द्यावी या प्रतीक्षेत काही सोसायटी असल्याने अजूनही बहुतांश सोसायट्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यास सुरु वात केलेली नाही. यासाठी पालिकेने प्रदर्शन देखील भरविले होते. परंतु त्याला देखील फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.       ठाण्यातील १ हजारांपेक्षा अधिक सोसायटीना ठाणे महापालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आल्या असून ज्या सोसायट्यांचा, मॉल तसेच हॉस्पिटलचा दररोजचा कचरा १००० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. तसेच ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ ५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, अशा सोसायट्यांना स्वत:च कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरवातीला ठाणे महापालिकेच्या वतीने कचºयाची विल्हेवाट लावण्याचे आवाहन देखील करण्यात आले. मात्र तरीही सोसायट्यांचा प्रतिसाद न आल्याने काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या वतीने अशा सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद केले होते. त्यानंतर या सोसायट्यांना मार्च पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीमध्येच लावण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आता केवळ ८ ते १० टक्के सोसायटींनी या प्रक्रि येला सुरु वात केलेली आहे. त्यामुळे उर्वरीत सोसायटींचा कचरा मे पासून न उचलण्याचे पालिकेने निश्चित केले होते. परंतु पालिकेने पुन्हा एक पाऊल मागे येत, या सोसायटींना नोटीसा बजावण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच मे च्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा प्रदर्शन भरविण्याचे निश्चित केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdumpingकचरा