शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 07:09 IST

अवैध ठरवलेल्या १२ उमेदवारांच्या अर्जाबाबतचे निर्णय न्यायालयाने योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.

अंबरनाथ : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या जन्मदाखल्याच्या वैधतेला आव्हान देणारा अर्ज कल्याण न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. निवडणुकीत अर्ज छाननीमध्ये ज्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. १३ याचिकांपैकी १२ याचिकांचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला. केवळ घोणे यांच्या प्रकरणात पालिकेने त्यांचा वैध ठरवलेला अर्ज न्यायालयाने अवैध ठरवला. करंजुले यांचा जन्मदाखला ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरील असल्याने तो अवैध असल्याचा अर्ज करण्यात आला होता. मात्र हा दावा न्यायालयाने अमान्य केला. 

गणेश घोणे यांचा अर्ज न्यायालयाने ठरवला बादप्रभाग क्र. ८चे अपक्ष उमेदवार गणेश घोणे यांचा छाननीत वैध ठरवलेला उमेदवारी अर्ज न्यायालयाने अवैध ठरवल्याने घोणे यांना निवडणूक लढवता येणार नाही. मात्र नगरपालिकेच्या निवडणूक विभागाने सूचक, अनुमोदक यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणास्तव अवैध ठरवलेल्या १२ उमेदवारांच्या अर्जाबाबतचे निर्णय न्यायालयाने योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.

न्यायालयात चूक कबूल उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज आल्यामुळे अर्ज छाननीच्या वेळेस काही चुका होऊ शकतात आणि त्यातूनच प्रभाग क्रमांक आठमध्ये नजरचुकीने अपक्ष उमेदवार घोणे यांचा अर्ज वैध ठरवला गेला. मात्र हा अर्ज न्यायालयाने अवैध ठरवला. या प्रकरणात पालिका प्रशासनाने स्वतःची चूक न्यायालयात कबूल केली. कल्याण न्यायालयाने सर्व अर्जांवर मंगळवारी निकाल दिल्याने आता निवडणुकीची पुढची प्रक्रिया सोपी झाली. बुधवारी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for BJP's Ambernath Candidate; Court Validates Rejected Applications

Web Summary : Kalyan court upheld BJP candidate Tejashree Karanjule's nomination. Twelve rejected applications were validated, while one previously approved was invalidated. The municipality admitted errors during scrutiny, paving the way for the election process to proceed smoothly. Independent candidates can now be assigned symbols.
टॅग्स :BJPभाजपाCourtन्यायालय