रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्याला नातेवाईकांची धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:24 IST2021-04-27T21:20:55+5:302021-04-27T21:24:23+5:30
छातीत दुखत असल्यामुळे लोकमान्यनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच योगेश कढरे (३९) या रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयीन कर्मचााºयाला धक्काबुक्की करीत आपला संताप व्यक्त केला.

लोकमान्यनगर येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: छातीत दुखत असल्यामुळे लोकमान्यनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच योगेश कढरे (३९) या रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयीन कर्मचााºयाला धक्काबुक्की करीत आपला संताप व्यक्त केला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
योगेश यांना मंगळवारी सकाळी छातीत तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटूंबीयांनी लोकमान्यनगर येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करता यावा, यासाठी त्यांना तातडीने सुरुवातीला एक टॅबलेट देण्यात आली. त्यानंतर त्रास कमी होण्यासाठी एक इंजेक्शनही देण्यात आले. मात्र, त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी एक तासाभराने त्यांचा मृत्यु ओढवला. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच आपला रुग्ण दगावल्याचा आरोप करीत कढरे यांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयातील एका कर्मचाºयाला धक्काबुक्की करीत त्याठिकाणी संताप व्यक्त केला. ही माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी जमावाला शांत केले. योगेश यांना लागोपाठ हह्दयविकाराचा तीव्र धक्का बसल्याची शक्यता रुग्णालयाने व्यक्त करीत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. त्यामुळे याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करुन योगेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. जर या अहवालात डॉक्टरांची चुकी आढळली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन घाटेकर यांनी दिले. दरम्यान, रुग्णालयाचे डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी मारहाणीबाबत कोणतीही तक्रार दिली नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले.