वेदांतमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 00:08 IST2021-04-27T00:06:23+5:302021-04-27T00:08:26+5:30

वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यु झाल्याचा दावा केला जात असला तरी यात चार नव्हे तर पाच जणांचा मृत्यु झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

Relatives claim that five people died in Vedanta | वेदांतमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा दावा

मृतदेहांसाठी राहावे लागले तिष्ठत

ठळक मुद्दे मृतदेहांसाठी राहावे लागले तिष्ठत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यु झाल्याचा दावा केला जात असला तरी यात चार नव्हे तर पाच जणांचा मृत्यु झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच विठ्ठल राठोड यांचाही मृत्युही झाल्याचा आरोप दिलीप राठोड यांनी केला आहे.
वेदांत रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५३ रुग्ण दाखल होते. त्यातीलच अरुण शेलार (५१), वरुणा पासते (६७), दिनेश तानकर (४१) आणि विजय पाटील (५७) या चौघांचाच मृत्यु झाल्याचा दावा रुग्णालय आणि ठाणे पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, सोमवारी ११.३० वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल राठोड या अन्य एका रुग्णाचाही मृत्यु झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. विठ्ठल हे सोमवारी पहाटेपर्यंत चांगले होते. अगदी रविवारी सुद्धा त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांची आॅक्सिजन पातळीही चांगली होती. मग, त्यांचा अचानक मृत्यु कसा झाला? यात रुग्णालय प्रशासनाचाच हलगर्जीपणा असून त्यांना आॅक्सिजनचा पुरवठा अपुरा पडल्याचा संशय राठोड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी राठोड कुटूंबीयांनी आपली कैफियत मांडली. जर पाच मृत्यु असतील तर राठोड यांच्याही मृत्युची चौकशी केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आठ तास उलटूनही मृतदेहाची प्रतिक्षा-
या चार जणांचे सकाळी मृत्यु झाल्यानंतर दुपारी ४ पर्यंत नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले नसल्याचीही तक्रार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी हे मृतदेह कोविडचे असल्यामुळे थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेले जातात. परंतू, कोणाचीही अडवणूक रुग्णालयाने न करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Relatives claim that five people died in Vedanta