शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

देवघरमध्ये टोमॅटोचे घेतले विक्रमी पीक

By admin | Updated: March 14, 2016 01:36 IST

पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे.

वसंत भोईर,  वाडा
पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे.
वसई तालुक्यातील आडणे, भाताणे येथे टोमॅटोची लागवड केली जाते. ठाणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये याचे तुरळक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र वाडा तालुक्यात सन २०१२ साठी वाडा पंचायत समितीत कुणबी सेना सत्तेवर आली तेव्हा देवघर गावचे सुपुत्र प्रफुल्ल पाटील हे उपसभापती झाले आणि त्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्थसहाय घेऊन शिवजलधारा योजनेअंतर्गत गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घ्यायला प्रवृत्त केले. डोंगराच्या कुशीत असून देखील सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शिवजलधारा योजनेचा प्रयोग पाटील यांनी प्रथम स्वत:च्या गावात करून तो यशस्वी केला. वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून २३ कि. मी. तर कुडूसपासून ६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावात शेतकरी अभिनव आणि अलंकार हे टोमॅटोचे बियाणे आणून स्वत:च रोप तयार करतात व स्वत: त्याची लागवड करून रोपांची विक्रीदेखील करतात.
एक एकरमधून १५०० क्रेट टोमॅटो निघतात याचे वजन ४५ ते ५५ टन असते. त्यासाठी २५०० ते ३००० रुपयांचे ५ पॅकेट बियाणे लागते. फवारणी तसेच मजुरी हा खर्च एकरासाठी अंदाजे दीड लाख रुपये येतो. टोमॅटोला ७ ते १५ रुपये प्रती किलो भाव मिळत असल्याने एकरी ३ लाख १२ हजारापर्यंत उत्पन्न देणाऱ्या टोमॅटोची लागवड करणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना कृषीउत्पन्न बाजार समिती वाड्यात नसल्याने तो दलालांमार्फत विकावा लागतो.
देवघर गावातील शेतकऱ्यांनी भात पिकाला पर्याय म्हणून टोमॅटोची शेती यशस्वी केली आहे. मात्र, सरकारच्या कृषी विभागाकडून त्यांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकिक कायम राखला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु ती आजवर पूर्ण झाली नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.