ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ; नव्या ४५० रुग्णांची नोंद तर, ११ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 19:55 IST2020-12-16T19:55:27+5:302020-12-16T19:55:32+5:30
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १०६ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ; नव्या ४५० रुग्णांची नोंद तर, ११ जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु बुधवारी जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. बुधवारी ठाणे जिल्ह्यात ४५० रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २ लाख ३७ हजार ३२९ तर, मृतांची संख्या आता ५ हजार ८४२ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १०६ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ७२३ तर, १२७८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १०० रुग्णांची तर, ३ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत १२३ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये ३० रुग्णांची नोंद झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ५ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
उल्हासनगरमध्ये २० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्येही ८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात २८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ५२९ झाली आहे. तर मृतांचा आकडा ५७४ झाला आहे.