उल्हासनगर भाजपात रंगला प्रवेश सोहळा
By सदानंद नाईक | Updated: September 3, 2023 16:49 IST2023-09-03T16:48:08+5:302023-09-03T16:49:28+5:30
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदिप रामचंदानी यांची नियुक्ती झाल्यावर, कॅम्प नं-५ येथील व्यापारी संघटना पदाधिकार्यासह अन्य जणांनी पक्षात प्रवेश घेतला.

उल्हासनगर भाजपात रंगला प्रवेश सोहळा
उल्हासनगर : शहर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदिप रामचंदानी यांची नियुक्ती झाल्यावर, कॅम्प नं-५ येथील व्यापारी संघटना पदाधिकार्यासह अन्य जणांनी पक्षात प्रवेश घेतला. यावेळी आमदार कुमार आयलानी यांच्यासह पक्षाच्या जिल्हाकार्यकारणीतील सदस्य उपस्थित होते.
उल्हासनगर कॅम्प नं-५, प्रभाग क्रं-१७ ते २० मधील लाल साई व्यापारी संघटना व लाल साई व्यापारी एसोसिएशनचे अध्यक्ष बंटी कुरसेजा, प्रकाश जवारानी, किशोर ताराचंदानी, शंकर रोहरा, माजी नगरसेवक रामल खेमनानी, गुल राजपाल, जयजीत सिंह, जगदीश राजपाल, अशोक भाटिया, राजेश वर्मा, हरेश जेसवानी, सुनील वलेचा यांच्यासह असंख्य जणांनी भाजपात प्रवेश केला. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यलयात प्रवेश सोहळा रंगला असून पक्षात येण्यास इच्छुक असणाऱ्यांना पक्ष प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती यावेळी शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिली. यावेळी आमदार कुमार आयलानी, माजी नगरसेवक शेरी लुंड, लखी नाथानी, अमर लुंड, डॉ बलराम कुमावत, दिनेश पंजाबी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारीकी उपस्थित होते.