सत्तरी उलटलेल्या ज्येष्ठांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:24 IST2021-02-22T23:24:20+5:302021-02-22T23:24:26+5:30

ठाणे : शाळेच्या संस्मरणीय  आठवणींत ७२ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा क्रिकेट सामना सोमवारी सेंट्रल मैदानावर रंगला होता. मो. ह. विद्यालयाच्या ...

Rangala cricket match in the seventies | सत्तरी उलटलेल्या ज्येष्ठांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना

सत्तरी उलटलेल्या ज्येष्ठांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना

ठाणे : शाळेच्या संस्मरणीय  आठवणींत ७२ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा क्रिकेट सामना सोमवारी सेंट्रल मैदानावर रंगला होता. मो. ह. विद्यालयाच्या १९६५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या गेट टूगेदर निमित्ताने आयोजित केलेल्या या सामन्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.  यावेळी शाळेचे माजी शिक्षक गणेश पेंडसे सरदेखील उपस्थित होते. कोणी गप्पा मारल्यास बाकावर उभे केले जाईल, असे सांगून त्यांनी मनोगताची सुरुवात करताच सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये एकच हंशा पिकला.

मो. ह. विद्यालयाच्या १९६५ बॅचच्या ७२ वर्षांवरील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा हा सामना होता. सकाळी ८.३० वाजता सर्व माजी विद्यार्थी मैदानावर जमले. एकूण ४५ जण होते. लहानपणी जसे खेळताना चिठ्ठी टाकली जायची तसे पुन्हा चिठ्ठी टाकून दोन संघातील सदस्य वाटून घेण्यात आले. २२ जणांनी क्रिकेट खेळण्याचा उत्साह दाखविला. दोन्ही संघात प्रत्येकी ११ जण  सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दोन्ही संघांना माजी शिक्षकांची नवे देण्यात आली होती.

सुबोध देशपांडे सर आणि गणेश पेंडसे सर हे दोन संघ आमने सामने खेळविण्यात आले. देशपांडे सर संघाचे निनाद आठल्ये यांनी, तर पेंडसे सर संघाचे केशव गलांडे या माजी विद्यार्थ्यांनी नेतृत्व केले. यात देशपांडे सरांचा संघ २ धावांनी विजयी झाला. त्यांनी १३ ओव्हरमध्ये ३९, तर पेंडसे सर संघाने ३७ धावा काढल्या. प्रत्येक सदस्याला खेळण्याची संधी देण्यात आली होती. नगरसेवक सुनेश जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. पेंडसे सरांनी आपल्या मनोगतात हा क्रिकेट सामना इतरांना प्रेरणादायी असल्याचे सांगून आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

Web Title: Rangala cricket match in the seventies

टॅग्स :thaneठाणे