उल्हासनगरात अग्निपथ योजनेविरोधात रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 19:09 IST2022-06-19T19:08:35+5:302022-06-19T19:09:47+5:30
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निपथ योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

उल्हासनगरात अग्निपथ योजनेविरोधात रॅली
सदानंद नाईक
उल्हासनगर : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात (Agneepath Scheme) डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनच्या वतीने रविवारी उल्हासनगर रेल्वे स्थानका ते लाल चक्की दरम्यान रॅली काढून मोदी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. कंत्राटी पद्धतीने देशाचे सरंक्षण धोक्यात येणार असल्याचे ज्योती तायडे म्हणाल्या आहेत.
उल्हासनगर रेल्वे स्थानक ते लालचक्की चौक दरम्यान रविवारी दुपारी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनच्या ठाणे जिल्हाध्यक्षा ज्योती तायडे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये मोदी सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करून अग्निपथ योजने विरोधात नारेबाजी करण्यात आली. डीयुएफआयच्या प्रीती शेखर, महेंद्र उघडे रामेशवर शेरे यांच्यासह विध्यार्थी आणि पालकांनी रॅलीत सहभाग नोंदविला. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निपथ योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.