उल्हासनगरात क्रीडांगण व्हावे यासाठी वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान राकेश खापरे यांची दौड   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 15:31 IST2025-08-15T15:31:17+5:302025-08-15T15:31:46+5:30

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरांत मुलांना खेळण्यासाठी अद्यावत क्रीडांगण व्हावे यासाठी स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून राजेश खापरे याने वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया सेल्फ अल्ट्रा १०० की.मी. ची मॅरेथॉन १० तास २० मिनिटांत पार केली.

Rakesh Khapre's race from Vangani to Gateway of India to build a sports ground in Ulhasnagar | उल्हासनगरात क्रीडांगण व्हावे यासाठी वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान राकेश खापरे यांची दौड   

उल्हासनगरात क्रीडांगण व्हावे यासाठी वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान राकेश खापरे यांची दौड   

उल्हासनगर - शहरांत मुलांना खेळण्यासाठी अद्यावत क्रीडांगण व्हावे यासाठी स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून राजेश खापरे याने वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया सेल्फ अल्ट्रा १०० की.मी. ची मॅरेथॉन १० तास २० मिनिटांत पार केली. ८ लाख लोकसंख्येला मैदान व क्रिडांगण नसल्याची खंत खापरे यांनी व्यक्त केली.

उल्हासनगरात चांगल्या दर्जाचे क्रीडा संकुल व क्रिडांगण मिळून तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प परिसरातील राकेश खापरे या वर्षीय तरुणाने, स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून वांगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गेटवे ऑफ इंडिया हे १०० की.मी. लांबीचे अंतर त्याने सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉनच्या माध्यमातून पूर्ण केल. शहरांत क्रीडांगण नाहीत, खेळाडूंना सोयी सुविधा नाहीत. त्यासाठीच त्यानं हे १०० किलोमीटरचं लक्ष निर्धारित केल होत. असे तरुणाचे म्हणणे आहे. या मॅरेथॉनसाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होता. दररोज २० किलोमीटर धावण्यासोबत पोषक आहारावर त्यानं भर दिला. सुदृढ आरोग्यासाठी तरुणांनी खेळ खेळायला हवेत. तसेच मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहायला हव, असा संदेशही राकेशने दिला. 

शहर पूर्वेतील दसरा मैदान नावालाच असून पश्चिमेतील दसरा मैदानावर अतिक्रमण झाले. व्हिटीसी मैदानात क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. तर गोलमैदानात विविध कार्यक्रमाला भाड्याने दिले जात असल्याने, मुले कुठे खेळणार असा प्रश्न नेहमीचा झाला. कॅम्प नं-५ येथे ऐक क्रीडासंकुल उभारले आहे. मात्र त्याचा कोण लाभ घेतो. त्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Rakesh Khapre's race from Vangani to Gateway of India to build a sports ground in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.