ठाणे जिल्ह्यात रक्षाबंधनला पावसाची विश्रांती; बारवीत ८९ टक्के साठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 20:04 IST2021-08-22T20:03:41+5:302021-08-22T20:04:27+5:30
जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली.

ठाणे जिल्ह्यात रक्षाबंधनला पावसाची विश्रांती; बारवीत ८९ टक्के साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून संतत धार सुरु पडणाऱ्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाला रविवारी मात्र काही अंशी विश्रांती घेतली. यामुळे या सणासुदीला बाजार पेठेत ही गर्दी पहायला मिळाली. गेल्या २४ तासात सरासरी ९.४ मिमी. पाऊस जिल्ह्यात पडला. धरण क्षेत्रातही पावसाने आज काही अंशी विश्रांती घेतली. बारवी धरणात आजपर्यंत ८८.९५ टक्के तर भातसा धरणात ८८.१० टक्के पाणी साठा आज तयार झाला असून दोन दरवाजे २५ सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत.
आज ठाणे शहर परिसरात ११ मिमी. पाऊस पडला आहे. याप्रमाणेच कल्याण ११ मिमी पावसासह मुरबाडला ३ मिमी, भिवंडीत १० मिमी, शहापूरला ८, उल्हासनगरमध्ये १४ मिमी आणि अंबरनाला ९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. बारवी धरणात गेल्या वर्षी अवघा ८६.८ टक्के पाणी साठा होता. तो आजच्या दिवशी ८८.९५ टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात आज ३४ मिमी, कान्होळला २८ मिमी, पाटगांवला ३८ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात ३२ मिमी, तर बारवी धरणात आज सरासरी २५ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८४.२० टक्केने वाढला आहे. याप्रमाणेच भातसा धरणात ८८.१० टक्के साठा असून दोन दरवाजे उघडून शनिवारी जलपूजन झाले. आंध्रात ६८ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.