शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 1:45 PM

कोरेगाव-भीमाप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता.

ठाणे - कोरेगाव-भीमा प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता. काही वेळासाठी त्यांनी रेल्वे रोखून धरली होती. यावेळी दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, रेल रोको करणाऱ्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रेल्वे वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

गुरुवारी सकाळी दलित युथ पँथरचे कार्यकर्ते भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करावी अशी मागणी करत रेल्वे रुळावर उतरले होते. मुंबईच्या दिशेने जाणारी फलाट क्रमांक चारवर जाणारी रेल रोको या कार्यकर्त्यांनी रोखून धरली होती. यामुळे काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या वाहतूक सुरळीत सुरु आहे. 

कोरेगाव-भीमाघटनेचे पडसाद गेले दोन दिवस संपुर्ण महाराष्ट्रभर पहायला मिळाले. बुधवारी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली होती.  कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. आंदोलनकर्ते हिंसक झाल्याने मुंबईत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. असे असले तरी मुंबई पोलिसांनी संयम राखत लाठीचार्ज न करताही जमाव नियंत्रित राहील याची काळजी घेतली. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी २५० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलनादरम्यान, विक्रोळी गोदरेज कंपनीच्या गेटपासून ते गांधीनगर जंक्शन परिसरातील एकामागोमाग एक अशा २००हून अधिक खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर भांडुप ते पवईच्या दिशेनेही रस्त्याकडेला पार्क केलेल्या खासगी बसेस आणि बेस्ट बसेस आंदोलकांनी लक्ष्य केल्याचे पाहावयास मिळाले. रेल रोको, रास्ता रोकोवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक झाली. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. अशात पवईच्या हिरानंदानी आणि आयआयटी परिसराबाहेर दुपारी तणाव वाढला. आंदोलकांनी खासगी सोसायटीतील सामानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रहिवासी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. अशात येथील काही आंदोलकांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पवई पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार शेलार, साठे, परब, कोळी, घोळवे, वाव्हळ, बादकर, कदम, जाधव आणि घोडेस्वार असे एकूण ११ जण जखमी झाले आहेत.

चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात दगडफेक झाली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेलेल्या गोवंडी पोलीस ठाण्याच्या १ क्रमांकाच्या गाडीची तोडफोड करत पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. यामध्ये सपोनि घोडे, घाडगे, अहिरे, जाधव तसेच चंद्रकांत निकम, मल्हारी मलबे, राजेंद्र पाटील, सोमनाथ सिंग, सागर जगताप, पूनम जोदे, धोंडीराम सरगर, किशोर भामरे, अजित तडवी, जीवन मोहिते हे पोलीस जखमी झाले. मुंबईतील अन्य भागांतही जमावावर नियंत्रण आणताना काही पोलीस किरकोळ जखमी झाले. तर तोडफोडीमध्ये काही बसचालक जखमी झाले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावthaneठाणेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदcentral railwayमध्य रेल्वे