काला-पिला जुगार अड्ड्यावर धाड

By सदानंद नाईक | Published: February 21, 2024 09:21 PM2024-02-21T21:21:02+5:302024-02-21T21:21:25+5:30

 उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौक परिसरात खेळला जाणाऱ्या काला-पिला जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता पोलिसांनी धाड ...

Raid on Kala-Pila gambling den | काला-पिला जुगार अड्ड्यावर धाड

काला-पिला जुगार अड्ड्यावर धाड

 उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौक परिसरात खेळला जाणाऱ्या काला-पिला जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता पोलिसांनी धाड टाकून ३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य उल्हासनगर पोलिसांनी जप्त केले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२, शिरू चौक येथील कराची मटणवाला दुकान गल्लीतील सार्वजनिक रस्त्यावर काला-पिला जुगार खेळला जात असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता पोलीस पथकाने धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सागर बाळू शिकलकर, हसन चांगामल खुबानी व अजयकुमार रामसिंग यादव यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
 

Web Title: Raid on Kala-Pila gambling den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.