शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

डोंबिवलीतील बारवर पोलिसांची धाड: १५ बारबालांसह ६७ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:57 PM

तोकडया कपडयांमध्ये अंगविक्षेप करीत ग्राहकांचे लक्ष वेधणाऱ्या १५ बार बालांसह ६७ जणांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई केली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई२५ ग्राहकांवरही कारवाईचा बडगाटिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बारमध्ये तोकडया कपडयांमध्ये नृत्य करणा-या १५ बारबाला, २५ ग्राहक, १० वेटर अशा ६७ जणांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर येथील बारमध्ये पहाटेच्या सुमारास कारवाई केली. यावेळी बारमधील दोन लाख दहा हजारांची रोकडही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.शेलार नाका येथील हॉटेल विक्रांत पॅलेस अ‍ॅन्ड बार याठिकाणी रात्री उशिरापर्यंत बारच्या मुली उशिरापर्यंत थांबून तोकडया कपडयांमध्ये अश्लील चाळे करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक आणि टिळकनगर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत २० डिसेंबर रोजी पहाटे १ ते ३ वा. च्या सुमारास याठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. मुळात रात्री ९.३० नंतर आॅर्केस्ट्रामधील चार मुलींना बारमध्ये थांबण्याची परवानगी असतांना याठिकाणी १५ मुली आढळून आल्या. शिवाय, हा बार उशिरापर्यंत सुरु होता. त्यामुळे हे धाडसत्र राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड