भिवंडीच्या राहनाळ जि.प. शाळेची मतदान जनजागृती रॅली

By सुरेश लोखंडे | Published: April 8, 2024 06:59 PM2024-04-08T18:59:25+5:302024-04-08T18:59:48+5:30

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान” अशा विविध घोषणा दिल्या. या घाेषणांचे फलक हाती घेऊन त्यांनी गावात रॅली काढून गावकऱ्याचे लक्ष वेधले.

Rahnal District of Bhiwandi School Vote Awareness Rally | भिवंडीच्या राहनाळ जि.प. शाळेची मतदान जनजागृती रॅली

भिवंडीच्या राहनाळ जि.प. शाळेची मतदान जनजागृती रॅली

ठाणे : गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागताेत्सवासह २० मेराेजी हाेणाऱ्या लाेकसभा निवडणुकीच्या मतदानात सर्वांनी माेठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करणारी रॅली भिवंडी तालुक्यातील राहनाळ जिल्हा परिषदेच्या (जि.प.) विद्यार्थ्यांनी काढून मतदारांचे लक्ष वेधले.

लोकसभेच्या मतदानाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सीप टीमने मिळून ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात गावात मतदान करण्याची जनजागृती करणारी रॅली काढली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान” अशा विविध घोषणा दिल्या. या घाेषणांचे फलक हाती घेऊन त्यांनी गावात रॅली काढून गावकऱ्याचे लक्ष वेधले.

या उपक्रमात सीप प्लॅन टीमचे पथक प्रमुख संजय अस्वले, काशिनाथ पाटील, योगेशकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, उदय पाटील, किरण पवार, शिवकांत खोडदे, अश्विनी पवार, सतीश जोशी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी होते.

यावेळी राहनाळ गावातील चौका चौकात शिक्षक अंकुश ठाकरे यांनी विद्यार्थ्यांमार्फत ग्रामस्थांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. संपूर्ण गावातील लोक दुतर्फा उभे राहून ही रॅली पाहत होते. नववर्ष अर्थात गुढीपाडवा हा पवित्र सण आणि त्या निमित्ताने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे. या निवडणुकीत प्रत्येक प्रौढ व्यक्तीने मतदान करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना मतदान करण्यास सांगावे असे आव्हान पथक प्रमुख संजय अस्वले यांनी उपस्थितांना केले. या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची होती.
 

Web Title: Rahnal District of Bhiwandi School Vote Awareness Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.