शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

महाराष्ट्र चळवळीत शेकापचे योगदान

By admin | Updated: August 4, 2014 00:29 IST

किरण माने : शेतकरी कामगार पक्षाचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महाराष्ट्र राज्य निर्मितीत शेतकरी कामगार पक्षाचे अमूल्य योगदान असल्याचे मत सातारा येथील अ‍ॅड. किरण माने यांनी आज, रविवारी व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जिल्हा सहचिटणीस भारत पाटील मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते. तत्पूर्वी, सकाळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव पाटील यांच्या हस्ते खासबाग, टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयाजवळ ध्वजवंदन झाले. अ‍ॅड. किरण माने म्हणाले, श्रमिकांचे राज्य आणण्यासाठी या पक्षाने आंदोलन केले. काँग्रेसने १९२० ला भाषा व प्रांतरचनेचा ठराव केला पण, तो अंमलात आणला नाही. भाषावार प्रांतरचनेला काँग्रेसचा विरोध होता. यासाठी शेकापने महाराष्ट्र समिती स्थापन करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली. या चळवळीत १०५ हुतात्मे झाले तर सुमारे एक हजार जणांना तुरुंगवास भोगावा लागला. या लढ्याची सुरुवात कोल्हापुरातील बिंदू चौकातून झाली. त्याची दखल घेत त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पुणे येथे दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य निर्मितीचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे राज्य निर्मितीच्या लढ्याला यश हे या पक्षाचे आहे.स्वागत जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार पाटील यांनी तर सुनीलकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास माजी महापौर शिवाजीराव कदम, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, सुशांत बोरगे, सुभाष सावंत, बाबूराव पाटील, मधुकर हरेल, अशोक चव्हाण, स्वप्निल कदम, संग्राम माने, सुनंदा मोरे, दमयंती कडोकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजीराव जगदाळे यांनी आभार मानले.५० जागा लढविणार...येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ५० जागा लढविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग संघटक मनीष महागांवकर यांनी शेकापमध्ये प्रवेश केला.