शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

दिव्यात ३५ एकरांवर सार्वजनिक सुविधांचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:59 AM

ठाण्याचे झपाट्याने विकसित होणारे उपनगर म्हणून दिवा परिसराकडे पाहिले जात आहे.

नारायण जाधव ठाणे : ठाण्याचे झपाट्याने विकसित होणारे उपनगर म्हणून दिवा परिसराकडे पाहिले जात आहे. या परिसरात रस्ते, गटारे, पाणीपुरवठा या पायाभूत सुविधा पुरवल्यानंतर आता दिवा-आगासन विभागासाठी सार्वजनिक सुविधांचे मोठे जाळे उभारून तेथील अंधार दूर करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यानुसार, येथील भारतीय रेल्वे कल्याणकारी संघटनेसाठी राखीव असलेल्या १३.८७ हेक्टर अर्थात ३४.६७ एकर या इतक्या विस्तीर्ण भूखंडावर बसस्थानक, मार्केट, हॉस्पिटल, विभाग कार्यालय, अग्निशमन दल, पोलीस ठाणे, जलकुंभ आणि वाहनतळ यासारख्या सार्वजनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासंदर्भात आरक्षणबदलाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने १५ एप्रिल २०१७ रोजी राज्याच्या नगरविकास विभागास पाठवला होता. त्यासंदर्भात इत्थंभूत अभ्यास करून पुणे येथील राज्याच्या नगररचना संचालकांनी मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेस या सार्वजनिक सुविधांचे हेजाळे उभारण्यास संमती दिली आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेने खास दिवा परिसरासाठी प्रभाग समिती गठीत केली आहे. त्यानंतर, आता आगासन येथील सर्व्हे नंबर-५ ते १२, सर्व्हे नंबर-१७ ते २५ आणि १७२, १७४, १७५, १७६ व १८९ वरील १३.८७ हेक्टर जागेवर या सुविधा उभारण्यात येणार आहेत.>भाजपास लगाम घालण्यासाठी शिवसेनेची खेळीदिवा परिसरात अलीकडच्या काळात भाजपा हळूहळू वाढत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीतही भाजपाला येथून लक्षणीय मते मिळाली होती. हा परिसर विधानसभेच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात मोडतो. यामुळे येत्या निवडणुकीत येथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्यासमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागात पायाभूत सुविधांसह सार्वजनिक सुविधाही पुरवण्याकडे ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. या रणनीतीचाच एक भाग म्हणून आता आगासन परिसरात सार्वजनिक सुविधांचे जाळे उभारण्यात येणार आहे.>कोपरी येथे मैदान : याशिवाय, कोपरी येथील खेळाच्या मैदानाची उणीव लक्षात घेऊन येथील सिटी सर्व्हे नंबर१०२४ या निवासी क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडापैकी १६०० मीटर या इतक्या भूखंडावर खेळाचे मैदान विकसित करण्यासही नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे कोपरीकरांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.>या १३.८७ हेक्टर जागेची विभागणी पुढीलप्रमाणेपोलीस ठाणे १.५ हेक्टरबसस्टॅण्ड ०.२५ हेक्टरमार्केट ३.०१ हेक्टरजलकुंभ १.०९ हेक्टरविभाग कार्यालय २.४ हेक्टरहॉस्पिटल २.४ हेक्टरवाहनतळ ०.७५ हेक्टरअग्निशमनतळ ०.७४ हेक्टर१५ मीटर रोड १.६४ हेक्टर

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका