शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात 20 हजार मोलकरणींच्या रोटीची सोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:08 IST

नाेंदणी नसलेल्या लाखभर घरेलू कामगारांच्या लाभाचे काय?

स्नेहा पावसकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. या बंदचा सर्वाधिक फटका माेलमजुरी करणाऱ्या वर्गाला बसतो. हे लक्षात घेत शासनाने काही घटकांना आर्थिक साहाय्य करण्याचे जाहीर केले आहे. यात घरकामगार करणाऱ्या महिलांनाही सरकारने महिना १२०० रुपये साहाय्य जाहीर केले आहे. ठाणे जिल्ह्यात आजच्या घडीला २० ते २२ हजार घरकामगार या नोंदणीकृत आहेत. तर सुमारे १ लाख घरकामगार महिलांची नोंदणीच नाही. त्यापैकी काहींच्या नोंदणीचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे एकूणच नोंदणी नसलेल्या लाखभर घरकामगारांच्या पोटापाण्याचे काय? असा प्रश्न त्यांच्या संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे घरकामगार महिलांचा रोजगार बंद झाला होता. गेल्या काही महिन्यांत ही कामे पुन्हा थोडीथोडी सुरू होत नाही तोच कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्याने पुन्हा एकदा राज्यात १५ दिवसाची संचारबंदी जाहीर केली आहे. हातावर पोट असलेल्या घरकामगार महिलांसाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली; परंतु ज्यांची नोंदणी नाही अशा महिलांना याचा लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर काही महिलांनी आता हा लाभ मिळावा म्हणून नोंदणीसाठी धावपळ सुरू केली आहे.

nराज्य सरकारच्या वतीने घरेलू कामगारांसाठी संत जनाबाई योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मोलकरणींची नोंदणी सुरू आहे. नाेंदणी असलेल्या घरकामगारांना शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळणार आहे. nमात्र, आता जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या घरकामगारांच्या नोंदणीच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. नोंदणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी या घरकामगार महिला लेबर ऑफिसमध्ये पोहोचत आहेत.सध्या घरकामगार महिलांची परिस्थिती खूप कठीण आहे आणि सरकारने मदत जाहीर केली, हे दिलासादायक आहे; पण ती मदतही तुटपुंजी आहे. त्यातही नोंदणी झालेल्या महिला खूप कमी आहेत. काही घरकामगार महिलांकडे पुरावे नसल्याने त्यांची नोंदणी झाली नाही, अशा स्थलांतरित महिलांची संख्या जास्त आहे. वयस्कर महिलांनाही लाभ मिळणार नाही. एकंदर ही मदत सर्व घरकामगारांना मिळणे कठीण आहे.    -रेखा जाधव, डिस्ट्रिक्ट को ऑर्डिनेटर, नॅशलल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर     ट्रस्ट, मुंबई

आमचा विचार करून शासनाने आम्हाला छोटी का असेना मदत जाहीर केली, याचे समाधान आहे. मात्र, ही मदत कमी आहे, त्यात थोडी वाढ करावी आणि कोविडचे हे संकट असेपर्यंत आम्हाला असेच साहाय्य करावे, अशी अपेक्षा आहे.    - विमल देरसे, घरेलू कामगारसरकारने गेल्यावर्षी नाही; पण आता मदत देणार असल्याचे सांगितले. याने आम्हाला थोडाफार हातभार लागेल; पण आमच्यापैकी अनेक महिलांची नोंदणी विविध कारणाने रखडली आहे, त्या महिलांचाही विचार करून आर्थिक साहाय्य करावे, कारण अनेक घरमालकांनी आम्हाला पुन्हा काम बंद करायला सांगितले आहे.    - दीपा सांबड, घरेलू कामगार