मीरा- भाईंदरमध्ये भाजपाची महाविकास आघाडी सरकार विरुद्ध निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 20:25 IST2021-03-21T20:24:53+5:302021-03-21T20:25:09+5:30
मीरारोड - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रावरून मीरा भाईंदर मध्ये रविवारी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या ...

मीरा- भाईंदरमध्ये भाजपाची महाविकास आघाडी सरकार विरुद्ध निदर्शने
मीरारोड - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रावरून मीरा भाईंदर मध्ये रविवारी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली . यावेळी भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी झडत राजीनामा देण्याची मागणी केली.
भाईंदर पश्चिमेस असलेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालया बाहेर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रेंच्या नेतृत्वा खाली निदर्शने करण्यात आली . नगरसेवक मदन सिंह , रवी व्यास , विनोद म्हात्रे , सुरेश खंडेलवाल , विजय रे , पंकज पांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते . तर हेमंत म्हात्रे विरोधक असलेल्या माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी सेव्हन स्क्वेअर शाळे जवळील भाजपा कार्यालया बाहेर निदर्शने केली . मीरारोड मध्ये सभापती दिनेश जैन व हेतल परमार सह नगरसेवक मनोज दुबे , सीमा शाह व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली . काशीमीरा भागात भाजपाच्या नगरसेवक , कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन केले . यावेळी महाविकास आघाडी सरकार भ्रष्ट असून वसुली सरकार असल्याचा आरोप भाजपाने केला .