उल्हासनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:42 IST2025-07-04T17:41:23+5:302025-07-04T17:42:13+5:30

पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

protest warning to remove dr babasaheb ambedkar statue from ulhasnagar crematorium | उल्हासनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर : शहरातील शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना उभारलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हटविण्याची मागणी नेते श्याम गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली. पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्याचा प्रकार उघड झाला. स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी उभारलेल्या पुतळ्या खाली रात्रीचे खेळ रंगत असून ही डॉ आंबेडकर याची घोर विटंबना असल्याचे मत रिपाई व कामगार नेते श्याम गायकवाड यांनी व्यक्त केले. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, चौक, मैदान, अभ्यासिका आदी ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे गरजेचे आहे. उल्हासनगरात चक्क समाधानभूमीत पुतळा उभारल्याची घटना देशात पहिली असून याबाबत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. उल्हासनगर शहर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र असून अश्या शहरांत डॉ आंबेडकर यांची होत असलेली विटंबना कशी काय खपवून घेतकी जाते. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

महापालिका पुतळ्याबाबत अनभिज्ञ?

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे संपर्क केला असता झाला नाही. तर जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो. असे उत्तर दिले. आरोग्य वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी याबाबत सांगण्यास नकार दिला. एकूणच महापालिका आयुक्त व अधिकारी पुतळ्याबाबत अनभिंज्ञ असल्याचे दिसून आले.

पोलीस उपायुक्त घेतात माहिती 

शांतीनगर स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या पुतळा हटविण्याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनाही श्याम गायकवाड यांनी निवेदन दिले. गोरे यांनी पुतळा बाबत महापालिका व इतर स्रोत मार्फत माहिती घेत असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी उभारला पुतळा...राजेंद्र चौधरी 

शिवसेना शिंदेगटाचे महानगरप्रमुख व स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी स्मशानभूमीत स्थानिक नागरिकांनी पुतळा बसवीला. अशी शक्यता व्यक्त केली. पुतळ्याच्या खाली खासदार श्रीकांत शिंदे व राजेंद्र चौधरी यांच्या सौजन्याने असे लिहले आहे. 

आंबेडकरी नेते गप्प? 

शांतीनगर स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विनापरवाना पुतळा उभारला आहे. भविष्यात याठिकाणी अनुचित घटना घडल्यास, जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र शहरातील आंबेडकरी नेते गप्प असल्याचे चित्र आहे.

Web Title: protest warning to remove dr babasaheb ambedkar statue from ulhasnagar crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.