शैक्षणिक संस्थांतील जातीय भेदभावाविरोधात ठाण्यात निषेध आंदाेलन! यूजीसी नियमांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 18:51 IST2026-04-04T18:49:51+5:302026-04-04T18:51:50+5:30

शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक संघटनांनी निषेध माेर्चा काढून निदर्शने केली.

Protest in Thane against caste discrimination in educational institutions! Protest for various demands including UGC rules | शैक्षणिक संस्थांतील जातीय भेदभावाविरोधात ठाण्यात निषेध आंदाेलन! यूजीसी नियमांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

शैक्षणिक संस्थांतील जातीय भेदभावाविरोधात ठाण्यात निषेध आंदाेलन! यूजीसी नियमांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

ठाणे : शैक्षणिक संस्थांमधील वाढत्या जातीय भेदभावाच्या घटनांविरोधात आणि ओबीसी, दलित, आदिवासी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी सशक्त कायदे करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक संघटनांनी निषेध माेर्चा काढून निदर्शने केली.

येथील शासकीय विश्रामगृहाजवळ माेर्चेकरी एकत्र आल्यानंतर त्यांनी घाेषणांचे व मागण्यांचे फलक हातात घेऊन घाेषणाबाजी करीत निदर्शने केली आहेत. शनिवार सुटीचा दिवस हाेता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी उपस्थित नव्हेते. त्यामुळे या कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर असलेल्या पाेलिस अधिकाऱ्यांकडेन माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. या माेर्चाचे नेतृत्व डाॅ. प्रकाश भांगरथ, शामदादा गायकवाड, प्रशांत सारखाेट,राजाराम पाटील, संभाजी काजरेकर, वसंत भाेईर आणि अनिल निचिते आदींनी या माेर्चाचे नेतृत्व केले.

या माेर्चेकरांनी केंद्र सरकारकडे तातडीने युजीसी रेग्युलेशन २०२६ लागू करण्याची मागणी केली. तसेच रोहित वेमुला, पायल तडवी, दर्शन सोळंकी यांसारख्या घटनांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांवरील जातीय अत्याचार वाढत असल्याचा आरोप यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आला.

आंदोलनात जातीनिहाय जनगणना, १०० टक्के आरक्षण, आरक्षणातील बॅकलॉग भरणे, कंत्राटीकरण बंद करणे आणि नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचीही मागणी करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ, कुणबी सेना, आरपीआय (सेक्युलर), आदिवासी एकता परिषद आदी अनेक संघटनांचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी सामाजिक समतेसाठी व्यापक एकजूट निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Web Title : ठाणे के शैक्षणिक संस्थानों में जाति भेदभाव के खिलाफ विरोध प्रदर्शन!

Web Summary : ठाणे में शैक्षणिक संस्थानों में जाति भेदभाव के खिलाफ सामाजिक संगठनों ने विरोध प्रदर्शन किया। ओबीसी, दलित और आदिवासी छात्रों की सुरक्षा के लिए सख्त कानून की मांग की। यूजीसी नियमों को लागू करने और बैकलॉग मुद्दों को संबोधित करने का आग्रह किया।

Web Title : Protest against caste discrimination in Thane educational institutions held.

Web Summary : Social organizations protested in Thane against caste discrimination in educational institutions, demanding stronger laws for OBC, Dalit, and Adivasi student protection. They urged UGC regulations implementation and addressed backlog issues.