राहूरी वकील दांपत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: February 1, 2024 17:32 IST2024-02-01T17:32:01+5:302024-02-01T17:32:40+5:30

या आंदोलनात शेकडो वकील सहभागी झाले होते.

Protest by lawyers in Bhiwandi to protest the murder of Rahuri lawyer couple | राहूरी वकील दांपत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचे आंदोलन

राहूरी वकील दांपत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचे आंदोलन

भिवंडी : अहमदनगर जिल्ह्यातील राहूर येथे राजाराम आढाव आणि मनिषा आढाव, या वकील दांपत्याची खंडणीसाठी हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत, तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी भिवंडी वकील संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा अध्यक्ष अॅड. दिनेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता.

या आंदोलनात शेकडो वकील सहभागी झाले होते. या निषेधार्थ गुरुवारी दुपार पर्यंत भिवंडी न्यायालयातील कामकाज न करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला होता. तसेच वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी देखील यावेळी वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
 

Web Title: Protest by lawyers in Bhiwandi to protest the murder of Rahuri lawyer couple