मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची निदर्शने

By नितीन पंडित | Updated: July 31, 2023 19:28 IST2023-07-31T19:27:52+5:302023-07-31T19:28:25+5:30

भिवंडी : मणिपूर येथील दोघा महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात देशभरात उद्रेक उसळला आहे.ठीकठिकाणी या घटनेचा निषेध केला जात आहे. ...

protest by Congress women workers in Bhiwandi against the Manipur incident | मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची निदर्शने

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची निदर्शने

भिवंडी : मणिपूर येथील दोघा महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात देशभरात उद्रेक उसळला आहे.ठीकठिकाणी या घटनेचा निषेध केला जात आहे.भिवंडीत सोमवारी शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष रुक्साना कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भिवंडीत शहर काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बॅनर वरील फोटोला जोडो मारो आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला आहे.

या आंदोलनात माजी खासदार सुरेश टावरे,काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर, महिला काँग्रेस प्रदेश सचिव रेहाना अन्सारी,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल पाटील,ओबीसी सेल शहराध्यक्ष अनंता पाटील,सोहेल खान,जावेद फारुखी यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.यानंतर सर्व महिलांनी मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांना या घटनेचा निषेध करणारे निवेदन सादर केला आहे.

 

Web Title: protest by Congress women workers in Bhiwandi against the Manipur incident