काशीमीराच्या लॉजमध्ये चालणारा वेश्याव्यसाय उघड; ५ जणांना पकडले, पीडित तरुणीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 21:15 IST2022-04-10T21:15:25+5:302022-04-10T21:15:30+5:30
शुक्रवारी पोलिसांनी सापळा रचून लॉजमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवले आणि आरोपींना ताब्यात घेतले.

काशीमीराच्या लॉजमध्ये चालणारा वेश्याव्यसाय उघड; ५ जणांना पकडले, पीडित तरुणीची सुटका
मीरारोड - काशीमीरा महामार्गावर असलेल्या अमर पॅलेस या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी ५ जणांना पकडले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना मीरागाव येथील मुंबई - अहमदाबाद महामार्गावर असलेल्या अमर पॅलेस लॉज मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली.
शुक्रवारी पाटील यांच्यासह कक्षाच्या पथकाने सापळा रचून लॉज मध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवले. साडेतीन हजार रुपयांच्या मोबदल्यात लॉजचा व्यवस्थापक व वेटर यांनी खोली आणि वेश्यागमनासाठी तरुणी उपलब्ध करून दिली. पंचाने पोलिसांना इशारा करताच पोलीस पथकाने धाड टाकून सदर लॉजचा चालक बळीराम उर्फ बाबु दत्तु घारे सह व्यवस्थापक भोला भुवनेश्वर पासवान (४८) व वेटर उमेशकुमार सहदेव राम (४०) , संजयकुमार बखुरी यादव (३६) राकेशकुमार प्रदीप पासवान (२०) चौघेही मूळ रा. झारखंड ह्यांना ताब्यात घेतले व पीडित तरुणीची सुटका केली.
ग्राहकाकडून वेश्यागमनासाठी घेण्यात येणाऱ्या साडेतीन हजार रुपयां पैकी हजार रुपये लॉजचे भाडे, दीड हजार लॉज कर्मचाऱ्यांचे कमिशन व हजार रुपये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तरुणीला दिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.