शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकर, पाणीपट्टी भरणा योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:02 IST

ठामपाने करदात्यांसाठी ही योजना जानेवारी व फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवली होती. या काळात अंदाजे ७० हजार करदात्यांनी मालमत्ता कराची ११० कोटीपर्यंतची रक्कम भरली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जे निवासी करदाते मालमत्ता व पाणीपट्टीवरील कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील, अशांसाठी थकीत करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर १०० टक्के सूट देण्याच्या योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.

ठामपाने करदात्यांसाठी ही योजना जानेवारी व फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवली होती. या काळात अंदाजे ७० हजार करदात्यांनी मालमत्ता कराची ११० कोटीपर्यंतची रक्कम भरली आहे. तर, पाणीपट्टीपोटी तीन महिन्यांत अंदाजे ५० कोटींची रक्कम भरली आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन या योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय शास्तीची  (दंड अथवा व्याज) रक्कम उपरोक्त मुदतीत एकत्रित भरणे अनिवार्य आहे. ज्यांनी कराची संपूर्ण रक्कम शास्तीसह या योजनेपूर्वी जमा केली असेल त्यांना ही सूट देय असणार नाही.  

‘डीजी ठाणे’ ॲपद्वारे कर भरल्यास सूट nऑनलाइनद्वारे मालमत्ताकर भरण्यासाठी देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. nत्याचबरोबर सर्व प्रभाग व उपप्रभागस्तरावील कर संकलन केंद्रे, नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्रे ३१ मार्चपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ५ तसेच सार्वजनिक सुटी व सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील. nमहापालिकेच्या ‘डीजी ठाणे’ ॲपद्वारे कराचा भरणा केल्यास विशेष सूटही मिळू शकेल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.