ठाणे महापालिकेची मालमत्ता कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

By जितेंद्र कालेकर | Published: December 29, 2022 06:23 PM2022-12-29T18:23:25+5:302022-12-29T18:25:22+5:30

मालमत्ता कर जमा न केलेल्यांने करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Property tax collection center of Thane Municipal Corporation will be open even on holidays | ठाणे महापालिकेची मालमत्ता कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

ठाणे महापालिकेची मालमत्ता कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

googlenewsNext

ठाणे: आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील करदात्यांना त्यांचा मालमत्ता कर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणे शक्य होण्यासाठी ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवली जाणार आहेत. मालमत्ता कर जमा न केलेल्यांनी करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्र आणि प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र हे १ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील सर्व शनिवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (७ मार्च रोजीचा धुलिवंदनाचा दिवस वगळून) सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यत आणि रविवार सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यत कार्यान्वित राहणार आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावरुन पेमेंट गेटवेद्वारे आॅनलाईन पध्दतीद्वारे मालमत्ता कर जमा करण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम अॅप द्वारेही करदाते मालमत्ता कर सुलभतेने जमा करु शकतील. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
 

 

Web Title: Property tax collection center of Thane Municipal Corporation will be open even on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.