शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धबधबे, तलाव, धरणांवर फिरण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 4:51 PM

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला. ठाणे जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला. ठाणे जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत

ठाणे ( जिमाका) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यात असल्याने  सार्वजनिक व खाजगी जागेत एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन करणे बंधनकारक आहे. तसेच, इत्यादींमुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधेब, तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे आहे.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला. ठाणे जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात येतात. अशा ठिकाणी  सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होवून प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी  होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार तसेच साथरोग नियंत्रण कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन  ठाणे जिल्हयातील खालील तालुका निहाय स्थळांना प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे आहे.

ठाणे तालुक्यातील येऊर धबधबे, सर्व तलाव, कळवा मुंब्रा रेती बंदर, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा, ही स्थळे आहेत.

मुरबाड तालुक्यातील सिध्दगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवीधरण परिसर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापुर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेवे मुरबाड, ही स्थळे आहेत.

शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ, कुंडन दहीगाव,माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब)सापगांव नदीकिनारी कळंवे नदी किनारा,कसारा येथील सर्व धबधबे ही स्थळे आहेत.

कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा,खडवली नदी परिसर,टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी ही स्थळे आहेत. 

भिवंडी तालुक्यातील नदीनाका,गणेशपुरी नदी परिसर ही स्थळे आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी ही स्थळे आहेत.

पावसामुळे वेगाने वाहणाच्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिश हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे. सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर / उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)

नमूद केलेल्या ठिकाणी असलेले धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली १ किलोमीटर परीसरात दि. 8 जून 2021 ते पुढील आदेश होईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील, असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई कळविले आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDamधरण