प्रियकराच्या मृत्यूबद्दल पे्रयसी कोठडीत

By Admin | Updated: January 9, 2016 01:58 IST2016-01-09T01:58:13+5:302016-01-09T01:58:13+5:30

एका ३० वर्षीय प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४५ वर्षीय विवाहित प्रेमिकेस काशिमीरा पोलिसांनी अटक केली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

Priyanka's closure about the death of a boy | प्रियकराच्या मृत्यूबद्दल पे्रयसी कोठडीत

प्रियकराच्या मृत्यूबद्दल पे्रयसी कोठडीत

मीरा रोड : एका ३० वर्षीय प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४५ वर्षीय विवाहित प्रेमिकेस काशिमीरा पोलिसांनी अटक केली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
मीरा रोडच्या शांती गार्डन, न्यू म्हाडा कॉलनीतील घरात चिराग नानालाल ढकान (३०) याचा मृतदेह १७ डिसेंबर २०१५ रोजी चादरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याआधी बुधवारी त्याने मित्रास आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला होता. चिरागच्या आईच्या फिर्यादीनुसार मीना जयदीप करांडे (४६ ), रा. बोरिवली ही त्याला मारझोड करत असे, कामाचे पैसे व जेवण देत नसे. पोलिसांनी त्यानुसार तिच्याविरु द्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
पत्ते-जुगाराचा क्लब चालवणारी मीना तेव्हापासून पसार झाली होती. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोविंद बोराडे तिचा शोध घेत असता ती मीरा रोडच्या विनयनगर भागात ५ जानेवारी रोजी सापडली. तिला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती.
ती विवाहित असून पती व मुलगा-मुलगी आहेत. ५ वर्षांपासून तिचे व चिरागचे प्रेमसंबंध होते. तसे काही फोटोदेखील सापडले आहेत. तिच्याकडे तो काम करायचा. परंतु, ती पैसे देत नसल्याने त्याचे तिच्याशी भांडण होत असे. आपण आत्महत्या करणार, असे त्याने सांगितले असता तिनेदेखील कर म्हणून म्हटले होते.

Web Title: Priyanka's closure about the death of a boy