शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

ठाण्यात उपवन येथे फुटबॉल मैदान शुक्रवारच्या महासभेत प्रस्ताव : पीपीपी तत्त्वावर होणार उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 5:27 PM

ठाणेकरांनाही फुटबॉलचा फिवर अनुभवण्याची संधी ठाणे महापालिका उपलब्ध करुन देणार आहे. उपवन येथील मैदानावर आता फुटबॉल मैदान पीपीपी तत्वावर विकसित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे६ हजार चौ. फुटावर मैदान होणार विकसितपीपीपी तत्वावर २० वर्षे दिले जाणार खाजगी संस्थेला चालविण्यासाठी

ठाणे : ठाणेकरांचे फुटबॉल प्रेम हेरुन महापालिकेने नव्या दमाच्या फुटबॉल खेळाडूंसाठी गावंडबाग, उपवन येथे फुटबॉलचे मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या उपलब्ध मैदानावर फुटबॉलचे टर्फ टाकून पीपीपी तत्त्वावर हे मैदान विकसीत केले जाणार आहे. फुटबॉल मैदानाची पुढील २० वर्षे खाजगी ठेकेदार देखभाल करणार आहे.ठाणे महापालिकेच्या हद्दीत क्रिकेट, अ‍ॅथलेटीक्स, टेबल टेनिस, बॅडमिटंन, रायफल शुटींग, स्केटींग आदीकरीता अद्यावत क्रीडा संकुले महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहेत. फुटबॉल हा खेळ जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळ ओळखला जातो. दिवसेंदिवस फुटबॉलच्या खेळासाठी मैदानाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने फुटबॉल खेळासाठी अत्याधुनिक मैदान विकसीत करण्याचे निश्चित केले. गावंडबाग येथील मैदान हे आॅलिम्पिक आकाराचे आहे. या मैदानात फुटबॉलकरीता आॅलिम्पिक दर्जाचे टर्फ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातूनही आतंरराराष्ट्रीय  दर्जाचे फुटबॉल खेळाडू तयार होऊ शकतील, असा विश्वास पालिकेला वाटत आहे. सुमारे ६ हजार चौ. फू. अंतरावर टर्फ अंथरले जाणार आहे. पीपीपी तत्त्वावर २० वर्षांच्या कालावधीसाठी ८०-२० टक्केवारीत हे मैदान विकसीत केले जाणार असून खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिले जाणार आहे. एकूण ११,२४७. ३४१ चौ. मी. क्षेत्रफळाचे मैदान खासगी ठेकेदाराला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलात विद्युतीकरण,पिण्याच्या पाण्याची सोय, कार्यालय, स्वागतकक्ष, वॉशरुम आदी सुविधा ठेकेदार महापालिका उपलब्ध करुन देणार आहे.खाजगी संस्थेकडून आर्टीफिशीअल टर्फ उपलब्ध केले जाईल. छोट्या मुलांसाठी प्ले पार्क आणि जनरल जिम, खेळांच्या मैदानाभोवती चालण्यासाठी वॉकींग ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट, क्रिकेटच्या नेट सरावाकरीता नेट उपलब्ध करुन देणे, फुड कोर्ट, स्पर्धा पाहण्यासाठी बैठक व्यवस्था, ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सर्व स्पर्धा व इतर स्पर्धा घेणे, खेळाडूंना मोफत बॉल, बिब्सचा पुरवठा करणे आदी सुविधा संबधित संस्थेला कराव्या लागणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवार १९ जानेवारीच्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाFootballफुटबॉल