पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या पत्नीचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 15:39 IST2019-06-04T15:38:25+5:302019-06-04T15:39:13+5:30

शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

Pratap Dighavkar's wife dies due to heart attack | पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या पत्नीचे हृदयविकाराने निधन

पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या पत्नीचे हृदयविकाराने निधन

ठळक मुद्देअस्मिता या ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथे राहतात. सकाळी ७ वा. च्या दरम्यान त्‍यांच्‍या ठाण्यातील घरी त्यांचे निधन झाले आहे. 

ठाणे - अंधेरी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अस्मिता दिघावकर (५२) यांचे आज (मंगळवारी)आकस्मिक् निधन झाले आहे. अस्मिता या विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या पत्नी होत्या. सकाळी ७ वा. च्या दरम्यान त्‍यांच्‍या ठाण्यातील घरी त्यांचे निधन झाले आहे. 
घराच्या बाथरूममधून बऱ्याच वेळ त्या बाहेर न आल्याने जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा त्या बाथरूममध्ये पडलेल्या होत्या. त्यांना त्वरित कासारवडवली येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू  झाल्याचे डॉक्टरानी  घोषित केले. प्राथमिक चौकशीत हृदय विकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. अस्मिता या ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथे राहतात. त्यांच्या पश्चात पती प्रताप, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Pratap Dighavkar's wife dies due to heart attack