शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

प्रकाश आंबेडकरांची बदलापुरातील सभा गुंडाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 19:48 IST

हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप

ठळक मुद्दे प्रकाश आंबेडकर या सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलणार होते.सकाळपासून जमलेल्या कार्यकर्त्यांचा यामुळे हिरमोड झाला आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यास बदलापुरात परवानगीच न मिळाल्याने ही सभा गुंडाळावी लागल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

बदलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बदलापूरात आयोजित केलेली वंचित बहुजन आघाडीची सभा आटोपूग घेण्याची वेळी आयोजकांवर आली आहे. प्रकाश आंबेडकर या सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलणार होते. मात्र त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास बदलापुरात परवानगीच न मिळाल्याने ही सभा गुंडाळावी लागल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मात्र, सकाळपासून जमलेल्या कार्यकर्त्यांचा यामुळे हिरमोड झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बदलापूर शहरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वपक्षियांनी आपला मोर्चा बदलापूर शहराकडे वळवला होता. भाजपचे कपिल पाटील आणि कॉंग्रेसचे सुरेश टावरे यांनी शहरात शक्ती प्रदर्शन केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही शहरात शक्तीप्रदर्शन करण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा येथील रोडू हेंद्रे घोरपडे मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली होती. त्यासाठी सभेची पूर्ण तयारीही झाली होती. सकाळपासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी जमण्यास सुरूवात झाली होती. भर उन्हातही सभेत गर्दी होती. मात्र प्रमुख पाहुण्यांबद्दल कोणतीही सूचना मिळत नसल्याने उपस्थितांनी सावलीचा आडोसा घेताना दिसत होते. सभेची वेळ दुपारी दोनपर्यंत होती. मात्र प्रकाश आंबेडकर वेळेत बदलापूरात येऊ न शकल्याने अखेर सभा गुंडाळावी लागली. त्यामुळे दोनच्या सुमारास ही सभा रद्द् करण्यात आल्याची घोषणा उमेदवार डॉ. अरूण सावंत यांनी सभेस्थळी केली. वेळेचे कारण सभा रद्द करण्यासाठी दिले जाते आहे. मात्र प्रमुख वक्त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी बदलापूरात परवानगी दिली जात नसल्याचे कारण आता समोर येते आहे. वेळेत पोलिस प्रशासनाने परवानगी दिली असती तर सभा झाली असती असेही आयोजकांकडून केला जातो आहे. मात्र या कारणाने सभा रद्द केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सुर उमटला होता. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकbadlapurबदलापूरcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी