प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार

By सुरेश लोखंडे | Updated: April 9, 2023 23:11 IST2023-04-09T23:10:49+5:302023-04-09T23:11:31+5:30

या उद्घाटनानंतरच्या भाषणात जाधव बोलत होते. 

Prabhu Shri Ram along with our loyal Shiv Sainiks, the Jadhavs' platoon | प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार

प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार

सुरेश लोखंडे 

ठाणे : खडकावर जरी बियाणे टाकले तरी त्याला अंकुर फुटतील, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. त्यामुळे पलीकडचे जरी रामाला भेटायला गेले असतील पण प्रभूराम निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच आहेत, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ठाण्यात आज व्यक्त केलं. लोकमान्य नगर येथील शिवसेना शाखेचे उदघाटन जाधव यांच्या हस्ते रविवारी रात्री झाले. या उद्घाटनानंतरच्या भाषणात जाधव बोलत होते. 

यावेळी शिवसेना खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे महिला आघाडीप्रमुख समिधा मोहिते, नरेश मनेरा आदी उपस्थितीत होते. शिवसेनेच्या शाखांची खूप मोठी महती आणि इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार हे अजरामर आहेत, ते विचार कोणाला पळवता येणार नाहीत. असं जाधव म्हणाले.कट्टर शिवसैनिकांवर कितीही संकटे आली, केसेस पडल्या तरी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मागे राज्यातील सर्वधर्मीय लोक खंबीरपणे उभे राहतील, असं जाधव म्हणाले. येथील शिवससैनिक चोरलेल्या शाखेच्या मागे गेले नाहीत. त्यांनी नवीन शाखा उभारली. कारण त्यांना माहित की येथील पोलीस काही करणार नाहीत. मला या सर्व शिवसैनिकांचा अभिमान आहे असंही जाधव यांनी म्हटलं.

 

Web Title: Prabhu Shri Ram along with our loyal Shiv Sainiks, the Jadhavs' platoon