शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १६ तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:23 IST

काही घरांमध्ये तब्बल १६ तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. स्वातंत्र्यदिनी अशी घटना घडल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे.

डोंबिवली : गोग्रासवाडी भागातील साकार रेसिडेन्सी येथे महावितरणच्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यामुळे तेथील साडेसात हजार ग्राहकांना त्याचा फटका बसला. काही घरांमध्ये तब्बल १६ तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. स्वातंत्र्यदिनी अशी घटना घडल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे.महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रान्सफॉर्मर, मुख्य उच्चदाबवाहिनी आणि अन्य एका यंत्रणेत एकाचवेळी बिघाड झाला. शुक्र वारी रात्री पाऊस पडत असल्याने कामात अडथळा येत होता. शनिवारी सकाळी महावीरनगर येथील एका फिडरवरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तरीही, एकनाथ म्हात्रेनगर भागातील पुरवठा दुपारपर्यंत सुरळीत झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. साकार सोसायटीच्या भागातील ट्रान्सफॉर्मर फेल झाला असून तो दाब घेत नसल्याने समस्या वाढली आहे.>‘विजेच्या त्रासातून सोडवा’आमच्या घरात आई आजारी असून त्यात १६ तास वीज खंडित झाली होती. बिले वारेमाप येतच आहेत. पण, अखंडित वीजपुरवठा मात्र महावितरण देऊ शकत नाही. याकडे सत्ताधारी, विरोधी पक्ष नेत्यांनी लक्ष घालून सोक्षमोक्ष लावावा व या त्रासातून सोडवावे, अशी प्रतिक्रिया अभिलाष पगारे या तरुणाने दिली.