शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मास्कचा वापर न करणाऱ्या ३४४ बेफिकिर नागरिकांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 9:44 PM

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाºया ३४४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ११२ ठिकाणी जनजागृतीही पोलिसांनी सुरु केली आहे.

ठळक मुद्दे१२६ हॉटेल आणि दुकान चालकांना नोटीसप्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाºया ३४४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच १२६ मंगल कार्यालय, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांनाही नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पोलिसांना सतर्कतेच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने नियम न पाळणाºयांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. विशेषत: मास्क परिधान न करणाºया ३४४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन करणाºया सात जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच १२६ मंगल कार्यालय, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच नियम डावलून घेतल्या जाणाºया बैठकांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली असून आतापर्यंत पाच ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ११२ ठिकाणी जनजागृतीही पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच दुकान, हॉटेल आणि इतर अस्थापनांमधील कामगारांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक केले आहे. नियम न पाळणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.

‘‘ कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सर्वांनीच वैयक्तिक जबाबदारी समजून खबरदारी घेतली पाहिजे. ठाणे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाºया ३४४ जणांविरुद्ध ठाणे कारवाई केली आहे. कारवाई आणि आजार टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त , ठाणे शहर 

 

 

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस