शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराकडून पोलिसांनी हस्तगत केली ५३ लाखांची रोकड

By जितेंद्र कालेकर | Published: October 18, 2019 11:55 PM

एकीकडे निवडणूकीचे वातावरण तापत असतांनाच ठाण्यात अण्णाभाऊ साठे आर्थिक घोटाळया प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार रमेश कदम यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून ठाण्यात कारागृहात परतण्याऐवजी ते ओवळा येथील एका खासगी घरात गेल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देघोडबंदर येथील कारवाईमुंबईत उपचारानंतर जेलमध्ये जाण्याऐवजी गेले ठाण्यातील फ्लॅटवरआयकर विभागाकडूनही चौकशी सुरु

ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्याकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक आणि कासारवडवली पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये ५३ लाख ४६ हजारांची रोकड शुक्रवारी दुपारी हस्तगत केली आहे. ठाण्यातून एक महत्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे सांगून कदम यांनी कैदी पार्र्टीच्या बंदोबस्तावरील पोलिसांना ठाण्यात आणले. तेंव्हा घोडबंदर रोडवरील एका घरातूनच त्यांना या रोकडसहित पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.अण्णा भाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळयातील प्रकरणामध्ये कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. याच प्रकरणामध्ये ते न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. १८ आॅक्टोंबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर ठाण्यातील एका मित्राकडून एक महत्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे कैदी पार्टीसाठी त्यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांना त्यांनी सांगितले. या पोलिसांनीही नियम धाब्यावर बसवत त्यांची मागणी मान्य केली. त्यांना मुंबईतून ठाण्यातील कारागृहात नेण्याऐवजी घोडबंदर रोड ओवळा येथे एका खासगी कारने आणले. ओवळा येथील ‘पुष्पांजली रेसिडेंन्सी’ इमारतीमधील तिस-या मजल्यावरील राजू खरे यांच्या खोलीत नेले. तिथून ते हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारी असतांनाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी त्यांना ५३ लाख ४६ हजारांच्या रोकडसहित रंगेहाथ पकडले. ते कैदी पार्टीतील पोलिसांबरोबर खासगी कारने घोडबंदर रोडवरील एका खासगी फ्लॅटवर गेल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. हीच माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग, कासारवडवली पोलीस आणि निवडणूक विभागाचे भरारी पथक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कदम यांच्याकडे मिळालेली ही रोकड आता निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.ही रोकड निवडणूकीसाठी जमविली राजू खरे यांचा दावादरम्यान, पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा असलेली ही रोकड आपली असून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ती जमविल्याचाही दावा राजू खरे यांनी केला आहे. आयकर विभागाकडूनही याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली..........................कैदी पार्टीतील पोलीस येणार अडचणीतकदम यांच्यासोबत बंदोबस्ताला असणा-या कैदी पार्टीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी आमदार कदम यांना पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेण्याऐवजी ओवळा येथील फ्लॅटवर नेले. तिथे नेण्यासाठी या पोलिसांनी कोणाची परवानगी घेतली? वरिष्ठांना याची कल्पना दिली होती का? कारागृह प्रशासनाला याची माहिती दिली होती का? निवडणूक काळात आमदार कदम ही रोकड नेमकी कोणाला देणार होते? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळेच कैदी पार्टीतील पोलीस पथक आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पथकावर नियमाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पुरेशा बंदोबस्तामध्ये कदम यांची पुन्हा ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.........................सोलापूरातून अपक्ष म्हणून उमेदवारीकदम यांनी विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोलापूर जिल्हयातील मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रचारासाठी आपल्याला मुभा मिळावी म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, न्यायालयाने ही याचिका अलिकडेच फेटाळली असल्याचे समजते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक