मीरारोडच्या हुक्का पार्लरवर पोलिसांची पुन्हा धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 13:21 IST2018-03-28T13:21:40+5:302018-03-28T13:21:40+5:30
मीरारोडच्या प्लॅझंट पार्क जवळील डॉमिनोज पिझ्झाच्या वर बेकायदेशीरपणे चालणारया हँग आऊट हुक्का पार्लरवर पोलीसांनी पुन्हा धाड टाकली.

मीरारोडच्या हुक्का पार्लरवर पोलिसांची पुन्हा धाड
मीरारोड - मीरारोडच्या प्लॅझंट पार्क जवळील डॉमिनोज पिझ्झाच्या वर बेकायदेशीरपणे चालणारया हँग आऊट हुक्का पार्लरवर पोलीसांनी पुन्हा धाड टाकली.
सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व त्यांच्या पथकाने हुक्का पार्लरवर धाड टाकली. या धाडीत ४० हुक्का पाईप, १५ तंबाकू मिश्रीत फ्लेवर असा १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर चालक अमित मिश्रा व अन्य चौघांवर कोप्ता कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे.
वास्तविक सदर इमारतीच्या गच्चीवर बेकायदेशीर शेड मध्ये चालणारया या हुक्का पार्लर विरोधात सातत्याने तक्रारी होत आहेत. विद्यार्थी व तरुणांचा मोठा राबता असतो. शेड बेकायदा असुन पालिका कारवाई करत नाही तर अग्नीशमन दलाच्या परवान्या बद्दल लोकं संशय व्यक्त करतात. पोलीसांनी काही वेळा धाडी टाकुन कारवाई सुध्दा केली आहे. परंतु तरी देखील सर्रास हुक्का पार्लर चालवले जात आहे.