उल्हासनगरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 18:01 IST2025-08-01T18:01:10+5:302025-08-01T18:01:28+5:30
Ulhasnagar News: कॅम्प नं-३, इंदिरा गांधी भाजपा मार्केट शेजारील हुक्का पार्लरवर मध्यवर्ती पोलीसानी गुरुवारी मध्यरात्री १ वाजता धाड टाकून ६ जणानं अटक करून गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पार्लरचे साहित्यासह ७ हजार ५७० रुपये रोख रक्कम जप्त केली.

उल्हासनगरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, गुन्हा दाखल
उल्हासनगर - कॅम्प नं-३, इंदिरा गांधी भाजपा मार्केट शेजारील हुक्का पार्लरवर मध्यवर्ती पोलीसानी गुरुवारी मध्यरात्री १ वाजता धाड टाकून ६ जणानं अटक करून गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पार्लरचे साहित्यासह ७ हजार ५७० रुपये रोख रक्कम जप्त केली.
उल्हासनगर कॅम्प नं-३, इंदिरा गांधी भाजी मार्केट परिसरातील एका घरात हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने गुरुवारी रात्री १ वाजता घरात सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. घर मालक शंकर बनसोडे हा त्याचा कामगार राज जितू बेहेनवाल याच्या मार्फत ग्राहकांना हुक्का पॉट भरून देत होता. यावेळी ४ ग्राहक हुक्का पार्लरचे सेवन करीत असताना मिळून आले. पोलिसांनी शंकर बनसोडे, राज बेहेनवाल यांच्यासह ६ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला. यावेळी तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पार्लर साहित्य जप्त करून घटनेचा पंचनामा केला. तसेच ७ हजार ५७० रुपये रोख रक्कम हस्तगत केले. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा २००३ चे कलम ४ (अ) २१(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.